जळगाव जिल्ह्यातील दैनिक, साप्ताहिक, मासिक, न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल मध्ये सक्रिय काम करणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुबंई संघटनेच्या वतीने १० लाखाचा अपघात विमा व हेल्मेट वितरण करण्यात येणार आहे. पत्रकार संघांचे सभासद असो अगर नसो आधी नोंदणी केलेल्या प्रत्येक पत्रकाराचा अपघात विमा काढण्यात येणार असून त्यासाठी पत्रकार बांधवानी व्हाट्सअप गृप
https://chat.whatsapp.com/KGc9rE11c4O4y0hRW9ewJq जॉईन करून
या ग्रुप वर आपलं नाव, मोबाईल नंबर आणि प्रेस कार्ड व्हाट्सअप करायचे आहे. लवकरच विमा काढण्याची व कार्यक्रमाची तारीख आपणास कळविण्यात येईल असे इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग,उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष सचिन गोसावी यांनी सांगितले आहे.
जळगाव जिल्ह्यातील ज्या पत्रकारांचा १० लाखाचा विमा काढायचा आहे त्यांचे पोस्टाचे खाते असणं आवश्यक आहे. तरी सर्व पत्रकार बांधवानी आपले खाते उघडून घ्यावे. तसेच ज्यांचे गेल्या वर्षी विमा काढले होते त्यांनी नव्याने खाते उघडण्याची आवश्यकता नाही.
पत्रकारांनी आपल्या सह कुटुंबातील सदस्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी विमा पॉलिसी असणे आवश्यक असल्याने जळगांव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष यांना पत्रकार बांधवानी संपर्क साधावा,असे आवाहन खानदेश विभाग उपाध्यक्ष प्रा.डॉ विजय गाढे यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क नंबर -09423903281

