अमळनेरात दि.२६ ला होणार दृष्टिहीन कलाकारांचा संगीतमय कार्यक्रम ******म.राज्य पत्रकार संघाने केले मदत सह उपस्थित राहण्याचे आवाहन 

 

अमळनेर प्रतिनिधी, येत्या दि. 26 सप्टेंबरला इंदिरा भुवन येथे एक अद्वितीय कार्यक्रम आयोजित केला जात आहे. चेतना मेलोडी ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून राज्यभरातील दृष्टिहीन कलाकार आपल्या कलेचे दर्शन देणार आहेत. अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट (महाराष्ट्र राज्य)च्या वतीने होणाऱ्या या ऑर्केस्ट्रा च्या कार्यक्रमातून दृष्टिहीन कलाकारांच्या कौटुंबिक खर्चाची पूर्तता केली जाते त्यामुळे कार्यक्रमाला मदतीचे आवाहन अंध अपंग संस्थेतर्फे करण्यात आले आहे

विविध कलाकारांची झलक:

या कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार प्रविण पाटील, अनेक पुरस्कार प्राप्त पूजा शेंद्रे, दुर्गा गवई, निर्मला शिरसाठ शहादा, पुष्पराज पवार, कमलाकर कुंभार, प्रविण पाटील, विनय वाघ, चंद्रकांत मैलागीर आणि अनेक अन्य कलाकार आपले प्रतिभावान सादरीकरण देणार आहेत.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दृष्टिहीन कलाकारांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कौटुंबिक परिस्थिती सुधारणे हा आहे. तसेच, समाजात दृष्टिहीन व्यक्तींबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हाही एक महत्त्वाचा हेतू आहे म्हणून हा कार्यक्रम केवळ मनोरंजनच नाही तर एक सामाजिक जबाबदारीही आहे. आपल्या उपस्थितीने आपण या कलाकारांचे मनोबल वाढवू शकतो. तसेच, विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी या कार्यक्रमात आर्थिक मदत करून या पुण्याच्या कार्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्टचे सेक्रेटरी तात्या पानपाटील यांच्या सह महारष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष समाधान मैराळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!