अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या घंटागाडी चालक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि आर्थिक हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य, वर्षातून दोनदा बोनस, नियमित भविष्य निर्वाह निधी (PF), ईएसआयसी आणि सन्मानजनक वेतनवाढ मिळावी, तसेच घंटा गाडी ठेकेदाराला काळया यादीत टाका अशी आक्रमक मागणी आम आदमी पार्टीचे अमळनेर तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंके यांनी प्रशासन व संबंधित कचरा संकलन कंत्राटदाराकडे केली आहे.

