अमळनेर प्रतिनिधी,येथील शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांच्या संकल्पनेतून जिजाऊ आय.टी.आय टाकरखेडे येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांनी तालुक्यात राबवत असलेल्या योजना बाबत तसेच राज्य व केंद्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली मग त्यात लाडकी बहीण असेल बचत गटाच्या योजना असतील बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना असतील आधी सर्व योजनांबाबत माहिती दिली
यावेळी जिजाऊ संस्थेच्या चेअरमन सुरेखा मधुकर पवार, टाकरखेडे चे सरपंच रामभाऊ ,जेष्ठ शिवसैनिक प्रकाश धोंडू पाटील,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, दूध डेअरी चेअरमन लक्ष्मण बाबुराव पाटील, वि.का.सो चेअरमन सुभाष आधार पाटील , ग्रामसेवक अविनाश पाटील, प्रभाकर पाटील, पुरुषोत्तम पाटील, कंडारी खु चे सरपंच सत्तर रामभाऊ पवार, ग्रा सदस्य आशाबाई रामकृष्ण पवार, मच्छिंद्र टेलर, सदर मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी शिवसैनिक बापूजी पाटील, अक्षय पाटील, किरण पाटील, करण पाटील, सोनू पाटील, भूषण पाटील, बुधा पाटील यांनी मेहनत घेतली.
मेळाव्याला कंडारी, लोणे, नगाव,पातोंडा, निमझरी ,औरंगपुर, दहीवद येथील नागरिक उपस्थित होते.
