अमळनेर:जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई उदय वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या ‘उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस’चे अमळनेर रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी हिरवा झेंडा दाखवून गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली.

