अमळनेर बाजार समिती नोकरभरती प्रकरणाला नवे वळण; गुन्हा दाखल होणार का? ……जिल्हा उपनिबंधकांच्या पत्रातील निरीक्षणांमुळे चर्चांना उधाण; पुढील कारवाईकडे लक्ष
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकरभरती प्रक्रियेबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्ते निंबा पाटील आणि अमळनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष हर्षल जाधव यांनी भरती प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी जळगाव जिल्हा उपनिबंधकांकडून मार्गदर्शन मागविले होते. उपनिबंधकांच्या पत्रात भरती प्रक्रिया शासनाच्या धोरणाशी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशांशी विसंगत असल्याचे नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यानंतर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांनी या प्रकरणात पुढील कारवाईसंदर्भात जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप तक्रारदार निंबा पाटील यांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मात्र, संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत पुष्टी उपलब्ध नसल्याने, या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का आणि प्रशासनाकडून पुढे कोणती कार्यवाही केली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच संस्थांमध्ये अधिकृतपणे व आदराने…