अमळनेर पोलीस ठाण्यात सदिच्छा भेटीचे औचित्य साधत अधिकाऱ्यांचा सत्कार…..अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची भेट; पोलीस-होमगार्ड समन्वयावर चर्चा

अमळनेर  : अमळनेर पोलीस ठाण्यात आढावा भेटीदरम्यान तत्कालीन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव अशोक नखाते यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्यासोबत विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली.

या सदिच्छा भेटीदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) विनायक कोते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, होमगार्डचे अमळनेर तालुका समादेशक गोपाल वना पाटील, कंपनी नायक अरुण नेरकर, वरिष्ठ पलटण नायक रविंद्र ठाकूर, तसेच जळगाव PTC येथील कैलास पाटील, कमलेश वानखेडे यांच्यासह पोलीस व होमगार्ड विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान पोलीस प्रशासन आणि होमगार्ड विभागाच्या कार्यातील समन्वय, प्रशासकीय बाबी तसेच विविध विषयांवर चर्चा झाली. पोलीस व होमगार्ड विभागातील परस्पर समन्वय अधिक दृढ करण्यासाठी अशा सदिच्छा भेटी उपयुक्त ठरतात, अशी भावना उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!