अमळनेर, : प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, गणित आणि संगणकशास्त्र या विषयांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इलेक्ट्रॉनिक्स, गणित आणि संगणकशास्त्र या क्षेत्रांतील भविष्यातील संधी, उच्च शिक्षण तसेच करिअरच्या विविध वाटां बाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्य विकास, सातत्यपूर्ण अध्ययन आणि नव कल्पनांना महत्त्व द्यावे, असे त्यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स व गणित विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एम. पी. भोळे तसेच प्रा. डॉ. नलिनी पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबंधित विषयांतील करिअरच्या संधी, रोजगाराच्या विविध क्षेत्रांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार करिअरची दिशा निश्चित करून त्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये आत्मसात करावीत, असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन, अभ्यासातील सातत्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यातील शैक्षणिक वाटचाली संदर्भात उपयुक्त माहिती मिळाली. कार्यक्रमामुळे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक प्रवासाबद्दल उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
अमळनेर : येथील नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात तब्बल ३३ वर्षे आपल्या ज्ञानदानाने शेकडो उत्तम शिक्षक घडविणाऱ्या ज्येष्ठ प्राध्यापिका…