राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप….अमळनेर शहर व तालुका शाखेचा सामाजिक उपक्रम; रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान

अमळनेर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

महासंघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. यावेळी रुग्णांना फळे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यात आली. सामाजिक कार्यातून गरजू व रुग्णांना आधार देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी स्वागत केले. समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अमळनेर शहर व तालुका शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!