पहाटे पहाटे नळाचे पाणी भरायला गेलेल्या विवाहितेचा टाकीत पडून झाला मृत्यू …

 

अमळनेर प्रतिनिधी, येथील शहरातील मराठा मंगल कार्यालय परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू.

सविस्तर वृत्त असे की,अमळनेर मधील उद्योगपती सुनील चौधरी यांची पत्नी जयश्री चौधरी या दि २० रोजीच्या पहाटे पाच वाजता नळाला पाणी आले म्हणून घरातील जमीन स्तरावरील असलेल्या खोलगट पाण्याच्या टाकीत शिल्लक पाणी पहायला गेल्या असता त्यात पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले.सदर ची बाब बराच वेळ त्या परत आल्या नाहीत म्हणून त्यांचे पती सुनील चौधरी यांनी मुलगी कल्याणी हिला शोधावयास पाठवले. मात्र जयश्री चौधरी आढळून आल्या नाहीत म्हणून सुनील चौधरी हे घरा बाहेर शोधायला गेले. मात्र त्याचवेळी मुलगी कल्याणी हिला टाकीचे झाकण उघडे दिसले म्हणून तीने टाकीत डोकावून पाहिले असता जयश्री पाण्यात बुडालेल्या दिसल्या. मुलीने परिसरातील काही लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सदर घटनेची अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयश्री चौधरी यांच्या पश्चात मुलगा ,मुलगी असा परिवार आहे.

जयश्री यांच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!