अमळनेर : पारंपरिकदृष्ट्या अवर्षणग्रस्त व टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या विशेष पुढाकारातून जलसंधारणाचे अत्यंत प्रभावी काम उभे राहिले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुष्काळ शमन योजनेअंतर्गत ₹१०,२६९.६५ लाख (सुमारे १०२.६९ कोटी) निधीतून मंजूर झालेल्या ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांमुळे तालुक्यात जलक्रांतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

