अमळनेर : महाराष्ट्रात सध्या मतदार यादीची विशेष आणि सखोल तपासणी मोहीम म्हणजेच ‘एस.आय.आर.’ (स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन – SIR) मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत मृत, स्थलांतरित किंवा अपात्र मतदारांची नावे वगळणे तसेच पात्र नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्याचे काम बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी जाऊन करत आहेत. या मोहिमेत बीएलओ आणि नागरिकांना सहकार्य व्हावे, या उद्देशाने ‘युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर’ या संस्थेने प्रभाग क्रमांक ८ मध्ये विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते.

