अमळनेर : आपल्या तालुक्याचा खासदार असल्यावर काय फायदा होतो, हे खासदार स्मिताताई वाघ यांनी केंद्र सरकारच्या विविध विभागांचे भव्य प्रदर्शन अमळनेर मध्ये भरवून दाखवून दिले आहे. कृषी, अणुऊर्जा, संरक्षण, आयआयटी अशा महत्त्वाच्या विभागांची माहिती ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचल्याने नागरिक समाधानी आहेत, असे गौरवोद्गार आमदार अनिल पाटील यांनी काढले.

