अमळनेर : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी निहारिका कोळी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समस्त अमळनेर तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

