अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र (खडकी, पुणे) येथे ११ ते १५ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेली पाच दिवसीय राज्यस्तरीय कुक्कुटपालन व अंडी उबवणी कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील ७० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणात अमळनेर तालुक्याचे पशुधन पर्यवेक्षक व माजी पंचायत समिती सभापती डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील (रा. मांडळ) यांनी प्रात्यक्षिकांमध्ये चमकदार कामगिरी करत ‘विशेष प्राविण्य’ मिळवले. समारोप प्रसंगी त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

