अंमळनेर | ग्रामीण भागातील महिलांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, या उदात्त हेतूने माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील यांनी १९८९ मध्ये अंमळनेर येथे पाहिलेले स्वप्न आज ३५ वर्षांनंतर सत्यात उतरले आहे. नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुक्मिणीताई महिला महाविद्यालयाने प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत शेकडो महिलांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पोहचवला आहे.

