अमळनेर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महात्मा फुले कॉलनीतील महिलांनी एकत्र येत पारंपारिक पद्धतीने झोक्याचा आनंद लुटला. बदलत्या काळात सणांचे स्वरूप बदलत असले, तरी येथील महिलांनी जुन्या परंपरा जोपासत सणाचा आनंद द्विगुणित केला.

