साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

     अमळनेर: येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाच्या वतीने महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती बोरसे म्हणाल्या की, “संविधान केवळ वाचण्यासाठी नसून ते आत्मसात करण्यासाठी आहे. आपण सर्वांनी संविधानाची काळजी घेतली पाहिजे आणि संविधानाचा जागर जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.”

या कार्यक्रमाला विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:

शिक्षक: जे.एस. पाटील, दिलीप पाटील, आर.एम. देशमुख, शैलेंद्र साळुंखे, मुकेश पाटील, दीपक महाजन, गौरव पाटील.

शिक्षिका: वैद्य मॅडम, वंजारी मॅडम.

या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे व सर्व संचालक मंडळाने कौतुक करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!