अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे यांचा मुलगा प्रा. रोशन पन्नालाल मावळे यांना भव्य फाउंडेशन, जयपूर यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय मैत्री संमेलनात ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली आहे.
फाउंडेशनच्या संचालिका डॉ. निशा माथुर व संचालक शैलेन्द्र माथुर यांनी ही माहिती दिली. हा भव्य सोहळा ५ एप्रिल रोजी जयपूर येथे आयोजित करण्यात येणार असून, देशभरातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित आयएएस व आयपीएस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
प्रा. रोशन मावळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात तसेच संशोधन कार्य आणि राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची दखल घेऊन त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
अमळनेर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय…
मुंबई: राज्यातील अभियांत्रिकी,विधी, फार्मसी,एमबीए, अशा महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी सीईटी आता दोन वेळा होणार आहे.याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने चाचपणी…