अमळनेर-येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी गांधी तीर्थ व अजिंठा लेणीस भेट दिली.ही भेट शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे आहे, केवळ दैनंदिन पाठ्यपुस्तकाचा अभ्यास न करता प्रत्यक्ष अनुभवातून देखील अभ्यास केला पाहिजे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रस्तुत शैक्षणिक सहल उपयुक्त होती. या शैक्षणिक सहलीचा हेतू म्हणजे प्राचीन भारतीय कला व स्थापत्य कलेचा सूक्ष्म पद्धतीने पाहणी करून अभ्यास करणे, ऐतिहासिक स्थळाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव व त्यांच्या जतनाची भावना वृद्धिगत करणे ही होती. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी दहा वाजता विद्यार्थी गांधी तीर्थ येथे पोहोचले.त्यांनी त्या ठिकाणी गांधी जीवन तत्त्वज्ञान, गांधींचे एकूण कार्य,गांधींचे स्व-अनुभव, मोहन ते महात्मा या ऑडिओ क्लिपचे घेतलेले अनुभव, ‘खोज गांधीजी की’ या मासिकाचे अध्ययन, गांधी तत्त्वज्ञान यावर आधारीत मासिके हे अनेक भाषा मधून विद्यार्थ्यांना अधिक वाचण्यासाठी उपलब्ध होती, त्याचे विद्यार्थ्यांनी अवलोकन केले. गांधी तत्त्वज्ञान हे डिजिटल माहितीपटातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. सत्य,अहिंसा, स्वदेशी व स्वालंबन ही चतु:सूत्री विद्यार्थ्यांनी विविध चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समजून घेतली. आत्मसाक्षात्कार, नैतिक कर्तव्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने गांधी तीर्थ भेट उपयुक्त होती.

