भल्या माणसा एकदा तरी….. पोलीस होऊन बघ…..

अरे भल्या माणसा एकदा तरी…..

पोलीस होऊन बघ…..

स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करून,

दुसऱ्याला न्याय देत बसून बघ 

स्वतःच्या आई-वडिलांची हॉस्पिटलमध्ये सेवा न करता,

आरोपीची सेवा करून बघ,

 

अरे भल्या माणसा एकदा तरी…..

पोलीस होऊन बघ…..

 

स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून,

स्वतःच्या मुलांना दुर्लक्षित करून,

दुसऱ्याच्या मुलांना आपली मुलं समजून खेळवत बस,

हरवलेल्या मुलांना शोधुन,

आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला न जाता,

एखाद्या अनोळखी व्यक्तीचा अंत्यसंस्कार स्वखर्चाने करून बघ,

 

अरे भल्या माणसा एकदा तरी….

पोलीस होऊन बघ…

 

आरोपीचे मेडिकल करून त्याच्या तब्येतीची दखल घेत बस,

दुसऱ्यांना वेळेवर जेवता यावे यासाठी स्वतः रस्त्यावर थांबून बघ,

आणि स्वतः मात्र अवेळी जेवून स्वतःची शारीरिक क्षमता कमी करून घेऊन बघ,

 

अरे भल्या माणसा एकदा तरी…..

पोलीस होऊन बघ…..

 

चोवीस तास नोकरी करून वरिष्ठांचे बोल खाऊन बघ,

कितीही केलं तरी असमाधानी व्यक्तीत राहून बघ,

आपल्या घरात वादविवाद होऊनही दुसऱ्याच्या घरातील वाद मिटवत बस,

आपल्या कुटुंबाची सोडून सर्वांची काळजी करत बस,

 

अरे भल्या माणसा एकदा तरी…..

पोलीस होऊन बघ…..

 

कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांना समर्पित 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

प्रा डॉ विजय गाढे 

मुख्यसंपादक, करडी नजर न्यूज 

खान्देश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुबंई 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!