अखिल भारतीय ग्राहक पंचायत ऑनलाइन सदस्यता नोंदणी अभियानात अमळनेर तालुका अग्रेसर – प्रांत सचिव डॉ अनिल देशमुख 

 

अमळनेर- अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे कार्यकर्त्यांच्या परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा प्रांत सचिव डॉ.अनिलजी देशमुख ह्यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना ऑनलाईन सदस्यता नोंदणी अभियानात अमळनेर तालुका याही वर्षी अग्रेसर असल्याची नोंद झाली असल्याचे सुतोवाच करीत प्रांत स्तरीय जवळ जवळ चार हजार सदस्यांनी नोंदणीत सहभाग घेतल्याचे स्पष्ट करीत अभिमानास्पद उल्लेख केला .कार्यकर्त्या परिचय मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन मनोगत व्यक्त करताना त्यांनी हे सुतोवाच केले .

     कार्यक्रमाची सुरुवात सौ गंगा अग्रवाल यांनी स्वागत गीताने केली. ऍड भारती अग्रवाल यांनी संघटन मंत्र म्हटले .स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदू नाना जोशी यांना पुष्पांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाचोरा येथील अ.भा.ग्राहक पंचायतीच्या सक्रिय कार्यकर्ता स्वर्ग सौ अरुणा उंटावंत व सौ कपिला मुठे यांचे जावई स्वर्ग रोशन मोहिते यांचे पुणे येथे अकस्मात निधन झाल्याबद्दल त्यांना सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली.

      याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ.अनिलजी देशमुख यांची मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या यथोचित सत्कार शाल व बुके देऊन मकसूद बोहरी यांच्या हस्ते करण्यात आला . तसेच या प्रसंगी जिल्ह्या कार्यकारणीचे सदस्य ऍड सुभाषजी तायडे ,सौ निर्मलाजी देशमुख ,ऍड देवेंद्रजी जाधव , ऍड शिरीन अमरेलीवाला ,पाचोर्‍याचे सुधाकर पाटील , भडगाव चे निलेश बडगुजर तसेच मंगल ग्रह मंदिरचे विश्वस्त गिरीश कुलकर्णी व बहिरम सर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या यथोचित सत्कार करण्यात आला.

    या परिचय मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांच्या परिचय करून घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख तथा प्रांत सचिव यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच नूतन सदस्यांचा यात प्रमुख्याने ज्येष्ठ पत्रकार लेखक व कवी श्री सुभाष पाटील घोडगावकर , भाऊसाहेब देशमुख, पंकज चव्हाण ,सौ मनीषा भांडारकर, सौ गंगा अग्रवाल यांचे स्तुत्य स्वागत करण्यात आले.याप्रसंगी प्रस्तावित नूतन कार्यकारणी बाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. 

आपल्या अध्यक्षीय मनोगतात जिल्हाध्यक्ष व प्रांत सचिव डॉ.अनिल देशमुख यांनी अ.भा.ग्राहक पंचायत अमळनेर करीत असलेल्या ग्राहक व नागरिकांकरिता त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय दूर करून देणे करिता करीत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.महाराष्ट्रात सर्वप्रथम सर्व महिला सदस्यांची कार्यकारणी अमळनेर ग्राहक पंचायतीने अवलंबिवली व ती यशस्वी करून दाखवल्याबद्दल चे सुद्धा त्यांनी हार्दिक अभिनंदन केले अ. भा.ग्राहक पंचायतीने ऑनलाइन गेम बंद करण्याकरता विशेष प्रयत्न सरकारी यंत्रणेकडे केले व ते यशस्वी सुद्धा झाले त्यामुळे अनेक तरुणांचे प्राण व आर्थिक नुकसान सुद्धा वाचविल्याचे श्रेय अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे जाते असे त्यांनी नमूद केले

   सदर कार्यक्रम यशस्वी ते साठी अध्यक्ष सौ स्मिता चंद्रात्रे, सतीश देशमुख सर विजय शुक्ल , सुनील वाघ, जयंतीलाल वानखेडे, योगेश पाने ,सौ वनश्री अमृतकर, सौ ज्योती भावसार ,अंजू ढवळे सौ मेहराज बोहरी , कमलेश वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि याप्रसंगी इतर कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ कपिला मुठे यांनी केले . कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने एडवोकेट सौ भारती अग्रवाल यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!