माजी आमदार साहेबराव पाटील आल्यास एकाच गाडीत बसून जाणार प्रवेशाला – माजी आमदार शिरीष चौधरी शिंदे गटात प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले सुतोवाच
अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपाला सोडचिट्टी देत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली घोषणा.
अंमळनेरतील गेल्या सात आठ वर्षात खुंटलेला विकास व वाढती गुन्हेगारी पाहता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी असे सांगितले की, आमदार अनिल पाटील हें गुन्हेगारी मुळा सकट उखडून टाकण्याची भाषा करत होते मात्र त्यांच्या आज पर्यंतच्या कार्यकाळात जास्त खून झाले तर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले.याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याने व नागरिकांच्या रेट्यामुळे विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या शिवसेनेत येत्या मंगळवारी मुंबई येथे शिरीष दादा मित्र परिवारातील असंख्य नगरसेवका सह कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान माजी आमदार साहेबराव पाटील आपल्या सोबत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता त्यांनी सांगितले की ते गुलाबराव पाटील यांच्या सोबत प्रवेशाबाबत बोलले आहे. जर का ते आले तर एकाच गाडीत एकाच सीटवर बसवून मुबंईला जाऊ असे सांगितले.
अमळनेर च्या नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष ची जागा अनुसूचित जमाती गेल्याने अनेक लोक न्यायलयात गेले असल्याचे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, लोकशाहीत सर्वाना समान संधी मिळाली पाहिजे. एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी चालणार नाही. असे असल्यास त्यात स्पष्ट जातीयवाद दिसून येत आहे.
तर यापुर्वीच शिरीष दादा मित्र परिवारातील अनेक कार्यकर्ते यांनी आमदार अनिल पाटील यांच्या वर विश्वास ठेवून अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला असता शिरीष चौधरी यांनी सांगितले की, जाणारे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी मिळेल या आशेपोटी गेले आहेत मात्र ते ही येत्या काळात परत येतील अशी खात्री आहे.