सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणारे किरण बहारे राजकारणाच्या वाटेवर… शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून फुंकले रणशिंग…

अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ख्याती असलेले श्री किरण बहारे यांनी नुकतेच मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश घेऊन राजकारणाचा शुभारंभ केला.

     शहरातील ताडेपूरा भागात अनेक वर्षा पासून वास्तव्यास असलेले व आर्थिक संकटाला सामोरे जाऊन हवं त्याला दिवस रात्री मदतीस तत्पर असलेले म्हणून जनमांणसात परिचित असणारे श्री किरण बहारे हें आता जनतेच्या रेट्यामुळे राजकारणाच्या वाटेवर पदार्पण करण्यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून नवीन इतिहास घडविण्याच्या दिशेने वाटचाल केली. त्यांच्या या प्रवेशा समयी तालुक्यातील दिग्गज नेते माजी आमदार शिरीष चौधरी, पारोळा आमदार अमोल पाटील, पाचोराचे आमदार किशोर पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, नगरसेवक संजय पाटील, नगरसेवक बबलू पाठक, योगराज संदानशिव, दिपक चौघुले आदी सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या या निर्णयाचा समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुका सह स्वागत केले जात आहे.

   श्री किरण बहारे यांचा दांडगा जण संपर्क मनमिळावू वृत्ती सह दानिवृत्ती पाहता आगामी नगरपरिषद निवडणुकीत वार्ड क्र.3 मधून त्यांनी उमेदवारी करावी म्हणून शिवसेना पक्षा तर्फे आग्रह धरला जात आहे.त्यांच्या कार्याचा फायदा येत्या निवडणुकीत शिवसेनेला होणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!