अमळनेर नगर परिषदेचे महास्वच्छता अभियानाला सुरुवात… आपला परिसर स्वच्छ, सुंदर बनविण्यास हातभार लावावा – श्रीम.वेवोतोलू केजो,भाप्रस

अमळनेर येथील नपा प्रशासनाने दि १ जाने. ते ०७/०१/२०२५ दरम्यानच्या शहरातील प्रभागात महास्वच्छता अभियान केले सुरू.

सविस्तर वृत्त असे की,भारतीय प्रशासन सेवेतील नवनियुक्त प्रशिक्षणार्थी श्रींम. वेवोतोलू केजो यांची अमळनेर नगर परिषदेत नुकतीच प्रभारी मुख्याधिकारी पदावर नियुक्ती झालेली असून पदभार स्वीकारताच नगर परिषदेतील सर्व विभागांचा आढावा व पाहणी त्यांनी केली.

घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अभियान अंतर्गत त्यांनी दिनांक ०१/०१/२०२५ ते ०७/०१/२०२५ दरम्यान अमळनेर शहरातील प्रभागात महास्वच्छता अभियान / Deep Clean Drive राबविण्यात यावे म्हणून निर्देश दिले आहे. सदर अभियान अंतर्गत आज दिनांक ०१/०१/२०२४ शहरातील कृषिभूषण मार्ग, तिरंगा चौक, चोपडा नका परिसर, बस स्टेशन रोड, नगर परिषद कार्यालय परिसर ई. परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सदर अभियान अंमलबजावणी प्रसंगी श्रींम.वेवोतोलू केजो (भा.प्र.से.) प्र. मुख्याधिकारी नगर परिषद , अमळनेर तसेच उपमुख्याधिकारी श्री. रवींद्र चव्हाण, स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक श्री. किरण कंडारे, प्रभाग मुकादम व स्वच्छता कर्मचारी, नागरिक ई. मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर अभियान अंमलबजावणी दरम्यान शहरातील मुख्य रस्ते, दुभाजक, बोरी नदी पात्र परिसर, मुख्य चौक, कार्यालय परिसर ई. स्वच्छ करण्यात आले. अभियान दरम्यान स्वत: मुख्याधिकारी श्रींम. वेवोतोलू केजो यांनी उपस्थित राहून अभियान अंमलबजावणीची पाहणी केली. तसेच सदर अभियान अंमलबजावणी कामी शहरातील नागरिक, विद्यार्थी, बचत गट, विविध स्वयंसेवी संस्था, शाळा/महाविद्यालय, आस्थापना, राजकीय नेते, अधिकारी, कर्मचारी ई. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व अभियान अमलबजावणी कामी सहकार्य करून आपला सहभाग नोंदवून आपला परिसर स्वच्छ, सुंदर बनविण्यास हातभार लावावा, असे जाहीर आवाहन अमळनेर नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री. वेवोतोलू केजो (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!