सावत्र बापाने 9 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अमळनेर येथील शिरसाळे गावातील रहिवासी असलेल्या सावत्र बापानेच ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथे रवींद्र पारधी नामक व्यक्तीची मध्यप्रदेशातील सेंदवा तालूक्यातील धांदरा येथील एक महिला पती दारूमुळे मेल्याने रेल्वेत भीक मागत असतांना तिची ओळख झाली होती.सदर महिलेला एक 9 वर्षाची मुलगी सुध्दा होती.रविंद्र पारधी याने मुलीसह महिलेला शिरसाळे येथे आणून राहू लागले होते. रवींद्र हा बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. मात्र चार पाच महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन लागल्याने तो महिलेला मारहाण करीत होता. तिला रेल्वेत भीक मागायला पाठवू लागला. महिला सुरत भुसावळ मार्गावर भीक मागून उदरनिर्वाह करीत होती. दि १९ रोजी सदर महिला भीक मागून ती परत आली असता तिला झोपडीत रवींद्र पारधी हा तिच्या ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत असताना दिसून आला.मात्र रवींद्र ने सदर महिलेला घराबाहेर पड़ू न दिल्याने महिलेला पोलिसात फिर्याद देता आली नाही.सदर महिलेला संधी मिळताच मारवड पोलीस स्टेशनला फिर्यांद दिल्यावरून आरोपी रविंद विरुद्ध पोक्सो कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रवींद्रला अटक करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!