मी आघाडीचा उमेदवार असून अपक्ष सारखा लढलो – डॉ अनिल शिंदे…आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदेंच्या पराभव मागे आघाडीचे नेते ?

 

अमळनेर येथील विधानसभा निवडणुक ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा मा शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील हे येत्या विधानसभेत दिसणार नाही याची काळजी घेऊ,असे जाहीर केल्याने अमळनेर मधील आघाडीचे अनेक कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. पवार साहेब हे मलाच तिकीट देणार म्हणून वलग्ना करीत मिरवत होते.त्या अनुषंगाने विधानसभा क्षेत्रात प्रचाराला जोरात सुद्धा लागले होते.मलाच तिकीट मिळावी म्हणून दुसरा उमेदवाराची लायकी माझ्या पेक्षा कमी कशी आहे हे वरिष्ठांना सांगण्यात मग्न झाले होते. यामुळे आपसात मन व मतभेद होण्यात पोषक वातावरण निर्माण झाले.
राज्यात अनेक ठिकाणी आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात विलंब लागल्याने त्या ठिकाणी इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही की वरीष्ठ अपयशी ठरले,हे संशोधनाचा विषय आहे. अमळनेर येथील उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर काँग्रेसचे डॉ अनिल शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारां मध्ये नाराजी पसरली.काहींनी तर अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केले.नन्तर त्यांच्याशी वाटाघाटी झाल्यावर त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची चर्चा रंगली होती.

डॉ अनिल शिंदे यांनी स्थानिक आघाडीच्या सर्व नेत्यांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेले पाहायला मिळाले.त्यानंतर त्यातील काहींनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग सुद्धा घेतल्याचे दिसले. मात्र जस जसे मतदानाचा दिवस येत होता तस तसे आघाडीतील इच्छुकानीं आपला पावित्रा बदलल्याची चर्चा सुरू झाली. अनेकांनी युतीचे उमेदवार अनिल पाटील यांच्या सोबत बोलणी करून छुपा पाठींबा दिला. तर काहींनी प्रचारातून एकदम माघारी घेतली.आघाडीतील काही कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी मतदारांना प्रत्यक्ष अनिल पाटील यांना मतदान करा तर काही अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना मतदान करा,म्हणू न सांगत असल्याची चर्चा होताना अनुभवला मिळाले.

या सर्वांचा परिणाम आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदें यांच्या पराभवावर झाला. त्यांचा नुस्ताच पराभव झाला नसून त्यांचे डिपॉजिट ही जप्त झाले आहे.याचे कारण म्हणजे आघाडीतील नेत्यांच्या गावी अथवा वर्चस्व असलेल्या भागात डॉ अनिल शिंदे यांना मिळालेले अतिशय कमी मते होय.यावरून सिद्ध होते की आघाडीतील नेते सह कार्यकर्त्यांनी प्रामाणिक पणे आघाडीचा धर्म पाळला नाही.म्हणूनच पराभवाची नामुष्की ओढवल्याची चर्चा सुज्ञ नागरिक करीत आहेत.

डॉ अनिल शिंदे यांच्याशी संवाद साधला असतांना त्यांनी तिखट भाषेत उत्तर देले की, मी आघाडीचा जरी उमेदवार होतो तरी अपक्ष सारखा निवडणूक लढलो. आघाडीतील नेत्यांनी प्रामाणिक पणे काम केले असते तर माननीय शरद पवारांचे शब्द खरा ठरवता आला असता. आता लवकरच मी माझी पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांचा सदैव ऋणी राहील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!