सी .आर .पाटील .इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे 78 स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.

अमळनेर येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी .आर .पाटील .इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक 15 -08-24 रोजी 78 स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री. महेश पाटील सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन महेश पाटील यांच्या अध्यक्ष ते खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. मेजर दिलीप पाटील सर C.R.P.F force (on duty pulwama in Kashmir) यांनी ध्वजारोहणाचा मान मिळवला तसेच स्वतंत्र दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सौ .सीमा बडगुजर मॅडम, प्रतिष्ठा देवरे मॅडम यांनी आयोजन केले होतं तसेच अनेक मुलांनी देशभक्ती गीतांचे सादरीकरण केले. 78 वा स्वतंत्र दिनानिमित्ताने एक विद्यार्थी एक झाड असे घोषणा वाक्य देत सर्व विद्यार्थ्यांना एक एक झाडांचे रोपटे घेऊन निसर्ग संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करून मुलांना नैसर्गिक साधन संपत्तीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली पंकज पाटील मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सौ. अनिता पाटील मॅडम यांनी सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!