धुळे नवलनगर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभाग आणि क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालय नवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने के एन बी कला महाविद्यालयात दिनांक 5/9/2024 व 6/9/ 2024 या कालावधीमध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नगाव महाविद्यालयाचे डॉ. सुनील पाटील आणि किसान महाविद्यालय,पारोळा येथील डॉ.पी. डी.पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. एच. उभाळे हे होते.
उपस्थित दोघ मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. सुनील पाटील यांनी विचार मांडताना सांगितले की,आपण दरवर्षी वृक्षतोड करतो परंतु वृक्षाची लागवड करीत नाही. व पर्यावरणातील वातावरण कशा पद्धतीने बदलत चालला आहे.पूर्वी घनदाट जंगल होते रस्त्याच्या दुतर्फी भरपूर झाडे होते परंतु आता आधुनिकतेच्या नावाखाली बेजबाबदार पणे आपण वृक्षाची कत्तली केल्या आहेत त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे,असे
मार्गदर्शक प्रा. डॉ.पी. डी.पाटील किसान महाविद्यालय पारोळा यांनी ही पर्यावरण मध्ये संतुलन राहावे म्हणून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
