अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला वाढलेल्या काटेरी झाडे व झुडपांमुळे वाहतूक तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, ही झाडे व झुडपे तातडीने हटवावीत, अशी मागणी आम आदमी पार्टी, तालुका अमळनेर यांच्या वतीने अमळनेर नगरपरिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

