सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय! अमळनेरच्या १००० होतकरू विद्यार्थ्यांना मिळणार DL Social Foundation चे बळ!

अमळनेर:.समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या DL Social Foundation च्या अधिकृत शुभारंभ सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता इंदिरा भवन (स्वामी नारायण मंदिरामागे, स्टेशन रोड, अमळनेर) येथे करण्यात आले आहे.

​या सोहळ्याचे औचित्य साधून ‘ज्ञानदीप अभियान’ या सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. “शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत” या संकल्पनेतून अमळनेर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू अशा १००० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

​शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि समाजहिताच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या या संस्थेच्या उपक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संचालक डॉ. समाधान मैराळे आणि संचालिका सौ. भावना मैराळे यांनी केले आहे.

​मदतीसाठी संपर्क: अमळनेर तालुक्यातील गरजू व होतकरू विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी शैक्षणिक मदतीसाठी DL Social Foundation शी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!