अमळनेर : येथील विविध संस्थांमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये त्यांच्या राजकीय, सामाजिक व राष्ट्रीय कार्याचा गौरव करण्यात आला.

मराठी वाङ्मय मंडळात प्रतिमेचे पूजन
अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळात राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर बन्सीलाल भागवत, डॉ. एन. डी. ओसवाल, डॉ. सुरेश माहेश्वरी आणि प्रा. डॉ. विजय तुंटे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मा. गोविंद पाटील, हेमंत बाळापुरे, जगदीश कुलकर्णी आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत अभिवादन सभा
खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेतही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली. शाळा परिसर तसेच स्मारकातील पुण्यराजमातांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, ज्येष्ठ लिपिक श्री. शामभाऊ पवार, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. सतिश लाडगे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आर. एस. सोनवणे आणि ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एस. माळी यांनी प्रतिमेचे पूजन केले.

