अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळ’ या मासिक जनजागर सोहळ्याची चैतन्यमय वातावरणात सांगता झाली. अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यापासून (१९ मार्च) सुरू झालेल्या या अभियानाचा समारोप रविवारी (दि. १९ एप्रिल) मोठ्या उत्साहात करण्यात आला.

विधीवत भूमी अभिमंत्रण
या सांगता सोहळ्यानिमित्त विविध गावांतील शेतकऱ्यांनी आणलेली ‘एक मूठ माती’ एकत्रित करून तिचे मंत्रोपचारांच्या घोषात पूजन करण्यात आले. यावेळी भूमी अभिमंत्रण विधी पार पडला. अभिमंत्रित केलेली ही माती पाकिटात भरून उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी वितरित करण्यात आली. जमिनीचा पोत सुधारून ती सुजलाम-सुफलाम करण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती, ज्यात प्रामुख्याने:
-
प्रशासकीय: प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, कृषी विभागाचे योगेश वंजारी, दिनेश पाटील, दीपक चौधरी.
-
मान्यवर: कृषिभूषण सौ. राजश्री राजेश पाटील, पोलीसपाटील विश्वास महाजन, माजी उपसरपंच पुंजू पाटील.
-
मंगळग्रह सेवा संस्था: उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त डी. ए. सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण व इतर सेवेकरी.
