अमळनेर पोलीस दलाचा गौरव; विनोद संदानशिव, सुनील चौधरी व विनोद सोनवणे यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सन्मानपत्र

     अमळनेर: पोलीस दलात कर्तव्य बजावताना दाखवलेले धाडस आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत अमळनेर पोलीस स्टेशनमधील तीन कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून विशेष गौरव करण्यात आला आहे. सर्वश्री विनोद संदानशिव, सुनील (आबा) चौधरी आणि विनोद सोनवणे अशी सन्मानित करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांची नावे आहेत.

​       पोलीस दलातील आपली सेवा बजावताना या तिघांनीही विविध गुन्ह्यांची उकल करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले. त्यांच्या या यशामुळे अमळनेर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

​     अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या या जिवलग मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या यशाबद्दल शहरात तसेच त्यांच्या मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे. पोलीस दलातील या ‘त्रिकुटाने’ आपल्या कामाचा ठसा उमटवल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

​     त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल समाजातील विविध मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस आणि उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. “जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अशा कर्तव्यदक्ष पोलिसांमुळेच समाजाचा पोलिसांवरील विश्वास अधिक वृद्धिंगत होतो,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!