अमळनेर: “खान्देशातील आखाजी महोत्सव हा केवळ सण नसून तो अहिराणी संस्कृतीचा आरसा आहे. आधुनिक काळातही गौराई, झोक्यावरची गाणी आणि जात्यावरील ओव्या या परंपरा जपून ठेवणे आवश्यक आहे. यावर्षीचा महोत्सव प्रचंड प्रतिसादात यशस्वी झाला असून, भविष्यात हा महोत्सव शासकीय स्तरावर मोठ्या स्वरूपात साजरा व्हावा, यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांकडे पाठपुरावा करून शासकीय निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू,” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले.

