अमळनेर: शहरात सध्या विकासकामांपेक्षा पुतळ्यांच्या राजकारणाची अधिक चर्चा रंगू लागली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी आणि विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा उभारण्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, या ‘पुतळा पॉलिटिक्स’मुळे अमळनेरकर मात्र संभ्रमात पडले आहेत.

