तांबेपुरा भागात अनियमित पाणी पूरवठा होत असल्याने प्रवीण पाटलानीं नपा समोर केले स्नान..

 

अमळनेर येथील तांबेपुरा भागात ११ दिवसापासून पिण्याचे पाणी नसल्याने शिवसेना (शिंदे सेना) उपशहर प्रमुख प्रवीण पाटील यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी नगरपालिका समोर आंघोळ करून केले अनोखे आंदोलन.

सविस्तर वृत्त की, शहरात अनेक भागात भविष्यात 24 तास पिण्याचे पाण्याचे नियोजन साठी पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु असून त्यामुळे खोदकाम होत असल्याने जुनी पाईप लाईन फुटत असल्याने दुरुस्ती साठी वेळ लागत असल्याने शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी वेळ लागत. यामुळे अनेक भागात दहा बारा दिवस पिण्याचे पाणी येतच नसल्याची ओरड नागरिक करीत आहे.

प्रभाग क्रं दोन मध्ये सातत्याने पिण्याच्या पाणी पुरवठ्यात अनियीमतात होत आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने स्थानिक नागरिकां मध्ये नपा प्रशासना विरोधात आक्रोश निर्माण होत आहे.

त्याचा प्रत्यय आज साने नगर मधील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी आज नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेश द्वारा समोर आंघोळ करीत नपा प्रशासनाचा निषेध नोंदवला.प्रसार माध्यमाशी संवाद साधत सांगितले की, आम्ही प्रभाग क्रं दोन मधील नागरिक नियमित घरपट्टी व पाणीपट्टी नियमित भरत असूनही आम्हाला तब्बल दहा ते बारा दिवसा नंतर पाणी पूरवठा होत आहे.इतर ठिकाणी मात्र नियमित पाणी पुरवठा होत आहे. स्थानिक नगरसेवक यांच्या घरात समोर शासकीय बोरिंग असल्याने त्यांना बाकी नागरिकांच्या समस्याशी काहीही घेणे देणे नाही. याबाबी कडे आमदार अनिल पाटील व मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष घालावे.हा प्रशासनाचा निष्काळजी पणा आहे.याचा मी निषेध करतो.

शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न नपा प्रशासन कश्या पद्धतीने सोडवते, या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!