मुंबई,अधिस्वीकृतीधारक आणि अन्य पत्रकारांना दुपारी २ नंतरच मंत्रालयात प्रवेश देण्याबाबत गृह विभागाने दि २४ मार्चला परिपत्रक काढले होते. त्यामुळे पत्रकारांना मंत्रालयात येण्यावर निर्बंध येणार होते.

ही बाब वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी मुख्यसचिव आणि गृह विभागाला तातडीने पत्रक मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे हे परिपत्रक मागे घेण्यात आले आहे. आता पूर्वी प्रमाणेच पत्रकारांना सकाळपासून प्रवेश मिळेल याची नोंद घ्यावी, असे वार्ताहार संघटनेचे दिलीप सपाटे,दीपक भातुसे यांनी कळविले आहे.

