अमळनेर,मुडी बोदडै येथील अहिराणी चित्रपट गीतकार म्हणून परिचित असलेल्या तुषार उत्तमराव सैदाणे यांना नुकताच अमळनेर येथे अहिराणी साहित्य संमेलनात “अहिराणी कलावंत गौरव पुरस्कार २०२५” देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल दादा पाटील, जिप सदस्यां जयश्रीताई पाटील तसेच ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील,अर्बन बँकेचे रणजित शिंदे,भगवान पाटील, डि डि पाटील, मा आमदार डॉ बी एस पाटील, डॉ दिगंबर महाले,प्रशांत मोरे, खाशी संचालक वसुंधरा लांडगे,रमेश धनगर, प्रा डॉ लिलाधर पाटील, साहित्यिक गोकुळ बागुल,फुला बागुल तसेच अहिराणी चित्रपट कलावंत गीतकार संगीतकार ,ईश्वर माळी डॉ दत्ता ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
