अमळनेर ,शासकीय कत्राटदारांना काम करून ही गेल्या आठ महिन्यापासून देयक नमिळाल्याने राज्यातील कंत्राटदार करणार काम बंद आंदोलन.

सविस्तर वृत्त असे की,राज्य शासनाने दिलेल्या कंत्राटानुसार काम केल्यानंतर देयक न मिळाल्याने ही थकबाकी १ लाख कोटीपेक्षा जास्त रकमेवर पोहोचली असून कंत्राटदारांच्या संघटनांनी ५ फेब्रुवारी पासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.यामुळे विकासकामे ठप्ण होण्याची भिती असून काही कंत्राटदारांचे देयक मागील ८ महिन्यांपासून मिळालेले नाही.
कंत्राटदारांचे हे काम केल्याबाबतची देयके सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन,नगरविका विभाग,जलसंधारण विभाग, ग्रामविकास विभागाकडे
प्रामुख्याने पडून आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार कंत्राटदारांनी केलेल्या कामाची २०२४ च्या जुलैं महिन्यापासून जलसधारण विभागाकड़े १९,७०० कोटींची, नगरविकास विभागाकड़े १७०० कोटींची,सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४६ हजार कोटींची बिले थकीत आहेत.
कंत्राटदारांचीच बिले थकविल्याने ते कामगारांना काय देणार, घरखर्च कसा चालविणार,असा सवाल महाराष्ट्र कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षांनी विचारला आहे.
जलजीवन मिशनकड़े १८ हजार कोटीची, ग्रामविकास विभागाकड़े ८ हजार ६00 कोटी रुपयांची देयके थकीत आहेत.
राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वतीने कंत्राटदाराच्या मार्फत पायाभूत सुविधाची कामे करून घेतली जातात. पण त्यानी केलेल्या कामाचे देयकच दिले जात नाही.मागील जुलैं महिन्यापासून कंत्राटदारांची ही देयके मिळाले नसल्याने पुढील कामे कशाच्या भरवशावर करावी, पुढ़ील कामे करण्यास आर्थिक तडजोड़ कशी करावी, अशी कंत्राटदारांची आर्थिक कोंडी मागील ८ महिन्यांपासून सुरू आहे. केवळ आश्वासने देऊन कंत्राटदारांची बोळवण केली जाते.
त्यामुळे वैतागेल्या कंत्राटदारांनी १४ फेब्रुबारी पासून काम बंदचा इशारा दिला आहे. कंत्राटदारांचीच बिले थकविल्याने ते कामगारांना काय देणार, घरखर्च कसा चालविणार,असा सवाल महाराष्ट्र कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षांनी विचारला आहे.
