नवलनगर येथील .एन.बी. कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या या पावन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व नूतन उच्च माध्यमिक विद्यालय नवलनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तथा रायबा बहुउद्देशीय संस्था ,धुळे यांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंडळ नवलनगरचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब बी.टी.पाटील व उ.बा.ठा. या गटाच्या उपनेत्या, सौ शुभांगी ताई पाटील या प्रमुखातिथी म्हणून उपस्थित राहिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एच. उभाळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले .

याप्रसंगी अर्चना पाटील, कोमल पाटील, निकिता पाटील या विद्यार्थिनींनी महिला दिवसाच्या अनुषंगाने स्वागत गीत सादर केले .कु. हेमलता गोपाळ व कु. निकिता गोपाळ या विद्यार्थिनींनी सूत्र संचालनाची चोख भूमिका निभावली .त्यानंतर महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक, प्राध्यापिका व मान्यवरांच्या शुभहस्ते. लोकमाता अहिल्याबाई देवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .या दीप प्रज्वलनात द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी निकिता भाऊसाहेब पाटील हिच्या हस्ते ही दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रा. शिवाजी सूर्यवंशी सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागताची भूमिका चोख निभावली.मा. सौ शुभांगी ताईंचा सत्कार प्राचार्य डॉ. विजय उभाळे यांनी केला. तर मा. अँड विवेक पाटील सर यांचा एन.झेड. पाटील सर ,प्राचार्य डॉ. उभाळे सर प्रा. डॉ. सुजाता निकम, प्रा. सौ छाया पाटील मॅडम यांचाही महिला दिवसाच्या अनुषंगाने सत्कार स्वागत करण्यात आले. यानंतर प्रा. डॉ .यु.वाय. गांगुर्डे यांनी महिला दिवसाची प्रास्ताविक रूपाने मांडत असताना महिलांबद्दल समाजातील असणारा दृष्टिकोन हा कृतीयुक्त बदलला पाहिजे म्हणजे या दिवसाचे खऱ्या अर्थाने यश व यशस्वी होईल असे प्रतिपादन केले. प्रा. प्रमोद पाटील सर यांनी त्यांचा कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. शुभांगी ताई पाटील यांनी मा. आपल्या प्रबोधनातून स्त्रियांना समाजामध्ये योग्य स्थान देऊन प्रत्येक कुटुंबामध्ये समाजामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी महिला या स्वावलंबी झाल्या पाहिजेत .त्यासाठी समाजातील पुरुष वर्गाच्या कोणत्याही भूमिकेतून नैतिक आधार असला पाहिजे. स्त्री आणि पुरुषांमध्ये समानते पेक्षा सहचर्य असले पाहिजे. स्त्रीने शोभेल असे देवता रूपानेच कपडे ,शृंगार आपल्या संस्कृती आपला परंपरा चांगले जे असतील ते पाळून ,आपला विकास साधला पाहिजे, असाही विचार त्यांनी मांडला .महिला दिवसाची सुरुवात , महिलांनी केलेले क्रांतिकारी बदल यावर प्रकाश टाकला .त्यानंतर निकिता भाऊसाहेब पाटील या विद्यार्थिनीने लावणी नृत्य सादर केले.
महिला दिनाचे औचित्य साधून सण 2024-2025 या वर्षांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, मैदानी खेळ ,शैक्षणिक नैपुण्य, पुण्य साडी डे ,रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, तायकांदो, महिला कुस्ती यामध्ये नैपुण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण सौ शुभांगी ताई पाटील व श्री मा.भाऊसो. बी.टी.पाटील यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर निरोप समारंभ तृतीय वर्ष कला वर्ग या दृष्टिकोनातून भूषण थोरात, ऋषिकेश पाटील, वर्षा चव्हाण, अर्चना पाटील या विद्यार्थिनींनीही आपले विचार मांडले. काही विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या, तर काहींनी गीत गायन केले त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून राज्यघटनेपासून तर महिलांनी केलेल्या इतिहास काळातील विशेष कार्यापासून विद्यमान अवस्थेतील महिलांच्या अनेक उदाहरणे दिले .
प्राचार्य डॉ. व्ही.एच.उभाळे यांनी वैचारिक प्रबोधन मांडत असताना विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे प्रमाणपत्र रायबा बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्याकडून प्रदान करण्यात आले. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर प्रस्तुत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ए बी सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमात विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ. सुजाता निकम, प्रा सौ छाया पाटील ,प्रा विजय शिंदे ,प्रा शिवाजी सूर्यवंशी व प्रा. डॉ. यु.वाय.गांगुर्डे सर यांनी केंद्रीभूत महत्त्वपूर्ण भूमिकां निभावली. राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्याकडून विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ प्रा. डॉ एन .झेड. पाटील. प्रा. डॉ. ए बी सोनवणे, प्रा.डॉ.एस.जे पाटील, प्रा. पराग बोरसे ,प्रा. प्रमोद पाटील, प्रा. डॉ. के.डी. बागुल, संभाजी पाटील, रवींद्र धनगर,संजय पवार आदी शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला.
