अमळनेर येथील श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह यांच्या मार्फत आज महिला दिनाच्या औचित्य साधून एसटी महामंडळातील सर्व महिला कर्मचारी महिलांना उपयोगी व महिला कंडक्टर साठी अत्यावश्यक असलेले पर्स वाटप अमळनेर बस स्थानक आगार येथे करण्यात आले.

त्याप्रसंगी सर्व महिला कर्मचारी,डेपो मॅनेजर व कर्मचारी वर्ग हजर होते. श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह धार्मिक,सामाजिक कार्यात अग्रेसर असून ते नेहमी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपले चांगले उपक्रम राबवत असतात.
या महिला दिनी श्री भद्रा प्रतीक समूहाचे संचालक संदीप छबुलाल साळी यांच्या हस्ते बॅग वाटप करण्यात आले. कर्मचारी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते
डेपो मॅनेजर यांनी श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाच्या या कार्याचे कौतुक केले.
