अमळनेर नपा ने ४६०० रुपये दंड व १६.५ किलो प्लास्टिक केले जप्त

अमळनेर येथील नगरपरिषदेने प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई सुरू करीत नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, कमी दर्ज्याच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास पणे वाढल्याने पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत होता.नागरिक सदरच्या पिशव्या मध्ये खाण्याच्या वस्तु बाहेर रस्त्यावर अथवा उकिरडा वर टाकत असल्याने शहरातील मोकाट जनावरे सदरच्या पिशव्या खात असल्याने त्यांना शारीरीक आजार होत आहेत. यामुळे नपाने प्लास्टिक बंदी बाबत नपाच्या भा.प्र.से प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी वेवोतोलू केजो यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे तसेच शहर समन्वयक गणेश गढरी,शामराव करंदीकर , योगेश पवार,यूनूस शेख,महेंद्र बिर्हाडे, अनंत सनंदानशिव, सतीश बिर्हाडे आदींनी सुरू कार्यवाही केल्या.

 कारवाईत ६ दुकानदारांना ४६०० रुपये दंड करण्यात आला व १६.५ सोळा किलो प्लास्टिक केले जप्त.

नपा मुख्याधिकारी वेवोतोलू केजो– सर्व नागरिकांनी प्लास्टिक कॅरीबॅग यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर कराव व आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!