अमळनेर येथील तहसील कार्यालय आवारातून चोरीला गेलेले वाळूने भरलेला ट्रॅक्टर अवघ्या २४ तासात स्थागुशाने छडा लावून चोरासह घेतले ताब्यात.

सविस्तर वृत्त असे की,महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू चोरणाऱ्या लक्ष्मण शांतीलाल भिल याचे अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली पकडून कारवाई करीता अमळनेर तहसील कार्यालयात लावण्यात आले होते. मात्र दिनांक 14 रोजी सदरचे ट्रॅक्टर अमळनेर तहसील कायालयातून चोरून नेल्याने त्याबाबत अमळनेर पो.स्टे. ला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकाने अवघ्या २४ तासात लावला. चोरीस गेलेले ट्रूक्टर है मालक लक्ष्मण भिल याचा लहान भाऊ कमलेश उर्फ कल्पेश भिल रा. मोहाडी ता. जि. धुळे यानेच चोरून घेवून नेले असल्याची खात्रीशीर बातमी स्थागुशा मिळाल्याने पोलिसांनी मोहाडी गावात जावून कमलेश भिल याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.व त्याचे कडून निळया रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली अर्धा ब्रास रेतीने भरलेली असे जप्त करून त्यास गुन्ह्माचे पुर्ढील
तपासकामी अमळनेर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, गुन्हे शाखा पो निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, राहुल कोळी सर्व स्थागुशा जळगाव यांनी केली आहे.
या कारवाई चे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
