चर्मकार महासंघाचा मंत्री अनिल पाटील यांच्या पाठिंब्याचे समर्थन चर्मकार संघाने नाकारले….

अमळनेर प्रतिनीधी येथील राष्ट्रीय चर्मकार संघ यांचे कडून खुलासा करण्यात आला की,नुकतेच एका वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द झाली की,तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघचा मंत्री श्री.अनिल पाटील यांना जाहीर पाठीबा “अश्या आशयाच्या बातम्या काही वृत्त पत्रात प्रसिद्ध झाल्याने या बातमीचे राष्ट्रीय चर्मकार महासंघ अमळनेर समर्थन करत नाही. अदयाप संघा कडून कोणतीही बैठक झालेली नाही. सदरची बातमी फक्त एका परिसरात राहणाऱ्या समाज बांधवाची आहे. लवकरच आम्ही संपूर्ण अमळनेर शहरातील समाज बंधवाची बैठक आयोजित करुन त्याबैठकीत सर्वानुमते कोणाला समर्थन दयावे त्यावर विचार विनिमय करण्यात येणार असल्याचे शहर अध्यक्ष नरेश कांबळे यांच्या कडून पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!