नोटबंदी काळातील रांगेची पुनरावृत्ती लाडकी बहिण योजनेत ?

अमळनेर : महाराष्ट्र युती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी सुरू केल्याने तालुक्यातील सायबर कॅफे सह बँकेत गर्दी उसळत आहे.त्यातच उत्पन्नाचा दाखला,रेशनकार्ड व आधारकार्ड अपडेट साठी बहिणींची दमछाक होतानां दिसत आहे.शहरातील अनेक ऑन लाईन काम करणारे सायबर कॅफे बाहेर फॉर्म भरण्यासाठी अगदी पहाटेच्या पाच वाजे पासून या लाडक्या बहिणी रांग लावत असल्याचे पाहायला मिळत आहे.यात फॉर्म भरताना लिंक मध्ये अनेक अडथळे येत असल्याने वेळेचा खोळंबा होत असल्याने या लाडक्या बहिणींचा रोजगार बुडत असल्याचे चित्र निर्माण होताना दिसत आहे.कागद पत्र गोळा करताना सोबत एक व्यक्ती असल्याने त्याला ही कामावर दांडी मारावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

या योजनेच्या पार्श्भूमीवर कागदपत्रांची पूर्तता करत करत लाडकी बहिणीला नाकिनव येत आहे बँकेत के वाय सी सह इतर कामांना दिरंगाई होत असल्याने पहाटे पासूनच लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत आहे.अनेक महिला या ग्रामीण भागातील असल्याने त्यांना बँके बाहेर लाईन लावायला लवकर यावे लागत असल्याने ते उपाशी पोटीच उभे असल्याने प्रसंगी काहींना चक्कर सुध्दा येत असल्याच्या घटना घडत असल्याने ही चिंतेची बाब समोर आली आहे.अशीच स्थिती राज्यात अनेक ठिकाणी बघायला मिळते.

नोटबंदीच्या काळात ही नोट बदलण्यासाठी लांबच लांब रांगा बॅकेंच्या बाहेर लागल्या होत्या.त्यात अनेक ठिकाणी काहींचे जीव सुध्दा गेले होते.काहीशी अशीच स्थिती लाडकी बहीण योजनेतील कागद पूर्तता करण्यासाठी लावायला लागणाऱ्या रांगेच्या चित्रावरून दिसत आहे.अनेक बँका या कागद पूर्तता साठी अडवणूक करीत असल्याची ओरड होत आहे.त्यामुळे होत असलेली दिरंगाई ,या बाबी कडे बॅक प्रशासन लक्ष केंव्हा देईल? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहे.या गैरसोयी मुळे महीलानां मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

या लाडक्या बहिणींना होत असलेल्या त्रासाकडे भाऊरुपी सरकारने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत मतांच्या माध्यमातून परिणाम भोगावे लागेल अशी चर्चा सुज्ञ नागरिक करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!