कु.ग्रंथी पटेल हीची बुद्धिबळ स्पर्धेत विभागीय स्पर्धेसाठी निवड

अमळनेर प्रतिनिधी, येथील पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम ची विद्यार्थिनी कु. ग्रंथी पटेल हिने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विजयश्री प्राप्त करून विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की,इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी ग्रंथी पटेल ही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. जळगाव येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अनेक पात्रता फेरी प्राप्त करून नामांकित शालेय खेळाडूंना नमवीत सहा फेऱ्या गाठून सातव्या अंतिम फेरीत तिने विजयश्री संपादन केले. अतिशय उत्कंठावर्धक श्वास रोखून धरून लावणाऱ्या तसेच आपले सर्व कसब पणास लावून तिने अंतिम सामन्यात चुरशीने आकाशाला गवसणी घालणारे असे विजय संपादन केले. व त्याचसोबत तिची नाशिक विभागीय स्पर्धेमध्ये निवड झाली. मागच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारचे तिने ऐतिहासिक विजय संपादन केले होते. अतिशय चपळ व कुशाग्र बुद्धीने बुद्धिबळ खेळणारी खेळाडू म्हणून तिची ओळख असून तिच्या या नेपूण्याबद्दल नामांकित पंच व बुद्धिबळातील ज्येष्ठ खेळाडूंनी तिचे गौरवास्पद व अभिनंदनीय कौतुक केले असून भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. सदर खेळासाठी मार्गदर्शन प्रशिक्षण तंत्रशुद्ध प्रबोधन शाळेचे क्रीडा शिक्षक रोहन मुंदडा, महेश माळी, विनायक सूर्यवंशी यांनी केले.

सदर विद्यार्थिनीसाठी मार्गदर्शन सर्वोतोपरी साह्य शाळेचे चेअरमन श्री प्रदीपजी के. अग्रवाल, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका एम. एस. बारी, व्ही. पी. बडवे, प्रशांत वंजारी, व्ही.जी. बोरोले, राजश्री पाटील, समस्त शिक्षक वृंद वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंद वर्ग यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!