अमळनेर येथील अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबातील कल्पेश पारधी व मोहित मावळे यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

कल्पेश चे वडील कुडाळ सिंधुदुर्ग येथे एस टी महामंडळ मध्ये चालक असून अत्यंत मेहनत व जिद्दीच्या जोरावर कल्पेश याने एमपीएससी या परीक्षेत मंत्रालयीन लिपिक हे पद मिळवले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहें.तसेच अमळनेर येथील प्राण ग्रुप तर्फे कल्पेश चे अभिनंदन करण्यात आले आहे.
अमळनेर येथील लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे नेते पन्नालाल मावळे यांचे लहान चिरंजीव `मोहित पन्नालाल मावळे` याची एमपीएससी स्पर्धा परीक्षेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली मधील महसूल विभागात “महसूल सहायक” म्हणून निवड झाली आहे, सद्ध्या तो जलसंपदा विभागात “कॅनल इन्स्पेक्टर” म्हणून श्रीरामपूर येथे कार्यरत आहे, त्याची जिल्हा सत्र न्यायालय जळगाव येथे कनिष्ठ लिपिक सह सातारा येथे जलसंपदा विभागात भांडारपाल म्हणून हि नियुक्ती झाली होती, त्याने चोपडा तालुक्यातील लासुर व अंमळनेर तालुक्यातील नगाव येथे ब्रॅन्च पोस्ट मास्तर म्हणून काम केले असून त्याने डाक विभागात भारतात पाचव्या स्थानावर त्याचा कामाचा ठसा उमटवला होता, त्याच्या या उत्तंग यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
तसेच दोघांना भविष्यात त्याने यापेक्षा मोठया पदावर जावो या करडी नजर न्यूज तर्फे सदिच्छा..!!!
