शंकेश्वर नगरात अशोक विजयादशमी व महापरिवर्तन दिन उत्साहात साजरा बुद्ध वंदना, दीपप्रज्वलन, पुष्पपूजन आणि स्नेहभोजनाचे आयोजन; नगरसेवकांकडे नागरिकांनी मांडल्या समस्या

       अमळनेर  : शहरातील गळवाडे रोड परिसरातील शंकेश्वर नगर येथे अशोक विजयादशमी व महापरिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बुद्ध वंदना, दीपप्रज्वलन, पुष्पपूजन तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिसरातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.

       कार्यक्रमाची सुरुवात सिद्धार्थ सोनवणे यांच्या हस्ते बुद्ध वंदनेने झाली. प्राध्यापक अरुण सपकाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सुधाकर पवार यांच्या हस्ते पुष्पपूजन, तर वैशाली सपकाळे यांच्या हस्ते उदबत्ती पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पती तथा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब संदनशिव व नगर सेवक दिपक चौगुले उपस्थित होते.

      यावेळी अशोक विजयादशमी व महापरिवर्तन दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले. तसेच परिसरातील रहिवाशांनी नगरसेवकांसमोर आपल्या विविध नागरी समस्या व अडचणी मांडल्या. दसऱ्यानिमित्त उपस्थितांसाठी बासुंदी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

        कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी पोलीस पाटील सुधाकर पवार, निलेश पाटील (स्वादिष्ट नमकीन), भास्कर पाटील, सोमा कढरे, जय गजरे, डॉ. गोडसे, डॉ. सौंदाने, पंकज भावसार, सोनवणे, कैलास संदनशिव, उमेश, गोविंद बेसाने, परदेशी, पिंजारी, अजित सोंगडकर, बडगुजर, विसपुते, सुनील गडरे, अनिता सोनार,गौतम सपकाळे,सुनिल गढरे,साजिद अब्दुल पिंजारी,हमीद गुलाब पिंजारी ,सपकाळे परिवार सह शंकेश्वर नगरातील नागरिकांनी सहकार्य केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!