श्री मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायागाची मंगलमय पूर्णाहुती; भाविकांची मांदियाळी

     अमळनेर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी भव्य नवचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले. मंत्रोच्चार, दुर्गासप्तशती पाठ आणि वैदिक यज्ञविधींच्या मंगलमय वातावरणात सायंकाळी पाच वाजता पूर्णाहुती व महाआरतीने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली.

       मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सत्रांत पार पडलेल्या या महायागात देवी आदिशक्तींची विशेष पूजा, अभिषेक, हवन आणि विविध धार्मिक विधी करण्यात आले. डॉ. डिगंबर महाले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, सेवेकरी आणि विशेष यजमानांच्या उपस्थितीत मुख्य पूर्णाहुती अर्पण करण्यात आली.

       नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. भगवान श्री मंगळग्रह यांच्यासह भूमीमाता, पार्वती माता, अनघालक्ष्मी माता, भैरवी माता व लक्ष्मी माता यांच्या दर्शनासाठी अमळनेर, धुळे, जळगावसह विविध भागांतील भाविकांनी गर्दी केली. नवचंडी महायागानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

       यावेळी धुळे व जळगाव येथील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले. धार्मिक सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त व सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!